हॅलो! Here we are once again!
तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!!
थोडा उशीरच झाला या वर्षी ब्लॉग साठी पण ६ दिवस उशिरा का होईना “प्रिय XX” सिरीज मधला ब्लॉग आलाच.

मागील वर्ष हे माझ्या आणि माझ्या सारख्या लाखभर CA Final च्या विद्यार्थ्यांसाठी खूपच जास्त थकवणारं होतं. या वर्षी आम्ही चार महिने एकसारखा अभ्यास करून या १६ दिवसांच्या अग्निपरिक्षेला सामोरे गेलो. जस्ट दोन दिवस आधीच result ची तारीख पण जाहीर केलिये ICAI नी. ९ तारखेला कळेलच आमच्या निकालामध्ये काय उजेड पडतोय ते. निकाल काहीही येवो at least या पाच-साडेपाच महिन्यामध्ये जमेल त्या प्रतीने आमचा बेस्ट परफॉर्मन्स आम्ही दिलाय, याचं समाधान मात्र राहील.
माझ्या काही आप्तेष्टांसाठी मागचं वर्ष हे खूप स्पेशल होतं. रिताची पहिली भारतभेट, अण्णाचं लग्न, अखिलेशचं IIM आणि रोहितचं TU Dresden मध्ये झालेलं ॲडमिशन. आमच्या मित्रांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एवढी मोठी झेप घेतली आहे आणि त्याचा खूपच जास्त आनंद होतोय.
सरत्या वर्षामध्ये माझ्यासाठी सगळ्यात मोठी highlight काय असेल तर ती म्हणजे आमचा ऑफिसमधला वेळ. We enjoyed our shortfalls and learnt from it. आता काहीच दिवसांमध्ये आमच्या ऑफिसला बाय बाय करायचा वेळ येईल. मागच्या तीन वर्षांमध्ये मी माझ्या आयुष्यातली एक खूपच आनंदी कोअर मेमरी बनवलिये हे मी नक्कीच डोक्यात ठेवीन (कोअर मेमरी संदर्भ ब्लॉग). Thank you so much for everything!
नवीन वर्षाकडून माझी काय अपेक्षा असेल हे तर तुम्हाला आत्तापर्यंत समजून आलं असेलच. निकालाची अपेक्षा जी काय असेल तेवढीच ती फक्त.
येत्या वर्षामध्ये मी ब्लॉग लिहिण्यामध्ये थोडा जास्त regular होण्याचा प्रयत्न करेन. मागचं वर्ष हे खूप कमी लिखानाचं होतं. पुढील वर्षात हे निकालाचं टेन्शन जाऊन मी regularly लिहेन हीच फक्त आशा ठेवतो. भेटू आपण लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये. मी आत्ताच विषय declare करत नाहीये कारण declare करुन ब्लॉग लिहिण्याचं माझं रेकॉर्ड हे खूप जास्त खराब आहे. पण नक्कीच भेटू.
✌️✌️