Short #1

आमच्या गल्लीतला एक दादा आहे, दिपू दादा. तो मागच्या सहा-सात वर्षापासून स्वीडन का फिनलंड मध्ये कामाला आहे, त्याआधी पुण्यात दोन-तीन वर्ष होता. मी त्याला लहानपणीच भेटलो असेन, मला तर त्याचा चेहरा पण आठवत नव्हता. तो आता घरी आलाय विट्यात. परवा दिवशी संध्याकाळी तो कुठेतरी बाहेर चालला होता त्यावेळी त्याने मला लगेच ओळखलं. त्यानी मला विचारलं तनू कसा आहेस? काय करतो? मीही त्याच्या बरोबर पाच मिनिटे बोललो. एखाद्यानी असं विचारलं तर आपुलकीचा भाव येतो.

मी तसा गल्लीत पॉप्युलर होतो (नवसाचा आहे मी😏). मी त्यांच्या घरी जाऊन चिकू खाल्लेले आहेत, बोराटेंच्यात जाऊन लाडू, खारी बुंदी, फरसाना खाल्लेला आहे (दुकान आहे त्यांचं बाजारात), मिस्त्रींच्यात जाऊन तांदळाचे साखरेचे डबे उलटे केलेले आहेत, भाभींच्यात जाऊन दाल चावल खाल्लेला आहे. तसा मी लहानपणी कधी घरी नव्हतोच. त्यामुळे कधी लोकांनी ओळख दिली तेही मी चार वर्षे विट्यात नसताना, ते दहा वर्षे इथं नसताना चांगलं वाटतं आणि अशीच मला दुसऱ्यांना ओळख द्यायची आणि विचारपूस करायची कला जमू दे हीच प्रार्थना.

5 Comments

  1. Mrunmayee's avatar Mrunmayee says:

    Nice one

    Liked by 1 person

  2. Rohit's avatar Rohit says:

    👍👍 keep it up writing and getting girl’s comment both😂😂

    Like

  3. Akhilesh Atul Patki's avatar Akhilesh Atul Patki says:

    Its very special running into someone and spending your whole day reminiscing…

    Liked by 1 person

  4. Aniket's avatar Aniket says:

    Well done 👍

    Liked by 1 person

  5. Rohit's avatar Rohit says:

    Short but beautiful piece…..
    Keep it up.

    Liked by 1 person

Leave a reply to Aniket Cancel reply