
काल दरवर्षीप्रमाणे वाढदिवसादिवशी रामरक्षा म्हणायची झाली. मी दर वाढदिवसाला राम रक्षा मनातल्या मनात म्हणायचो. पण यावर्षी ज्यावेळी म्हणायला बसलो त्यावेळी आपोआपच मोठ्याने म्हणू वाटली. तशी लहानपणी रामरक्षा म्हणायची सवय होती आता भरपूर वर्ष झाली एवढी प्रॅक्टिस नाहीये. पण मला बर्यापैकी चांगली रामरक्षा म्हणता आली.
त्यामध्ये जवळपास तीन ते चार प्रकारचे छंद आहेत. आणि प्रत्येक छंदाची वेगळीच चाल. थाॅरसारखा “आय एम स्टील वर्दी” असा फील आला.
आईच्या पोटात असल्यापासून राम रक्षा ऐकत-म्हणत आलेलो आहे. रामरक्षा बद्दलची एक एकदम भारी आठवण आहे. चौथीमध्ये आमच्या लीलाताई शाळेमध्ये रामरक्षा म्हणायची स्पर्धा होती. त्यामध्ये काही तरी फक्त पाच दहाच श्लोक म्हणायचे होते. मला पूर्ण रामरक्षा येत असल्यामुळे मी पूर्ण रामरक्षा म्हणली. आणि नंबर माझाच आला. स्पर्धा झाल्यावर आमच्या मुख्याध्यापक सरांनी मला केबिनमध्ये बोलावलं. त्यांच्याकडून बक्षीस म्हणून एक नवनीत वही आणि पाठीवर कौतुकाची थाप दिली. असं कौतुक करायला मुख्याध्यापकांनी बोलवणं ही जरा मोठीच गोष्ट होती. शाळेमध्ये कौतुक मात्र कमी वेळा झालं त्यापैकी हे एक. ही आठवण कायम लक्षात राहील. आणि सर कायम लक्षात राहतील असेच होते.
Made me remember those days…
LikeLiked by 1 person