काही दिवसांपूर्वी मी ‘मला काहीच problem नाही’ हा सिनेमा पाहिला आणि त्यावेळापासून त्यातले विचार हे माझ्या मनात सतत घोळत आहेत. बरं ज्या लोकांनी हा सिनेमा पाहिला नाही त्यांच्यासाठी हा छोटीसा सारांश. दोन working parents, जे गेल्या ६-७ वर्षांपासून आपल्या आई वडिलांशी बोललेले नसतात. त्यांच्या अलिशान apartment मधील त्या दोघांमध्ये निर्माण झालेला दुरावा आणि त्यामुळे त्यांच्या ४ वर्षीय मुलाची होत असलेली कोंडी आणि कसे ते यातून बाहेर पडण्यासाठी प्रवास सुरू करतात हे सांगितले आहे.
फक्त एवढंच नव्हे तर हा सिनेमा आणखीन भरपूर छोट्या पण महत्वाच्या मुद्द्यांकडे आपलं लक्ष वेधून घेतो. जसे की आपण म्हणतो ते ‘The Big Fat Indian Wedding’ खरंच त्याची गरज आहे का?, आपण काही रुढी परंपरा पाळतो पण त्या पाळाव्यात का? आणि आपले आई वडील त्या पाळत असतील तर त्यामागे त्यांचं कारण काय? वगैरे.
जर तुम्ही मला विचारलं तर मला लहान मुलांबरोबरचा problem हा सर्वाधिक भितीदायक वाटतो. कारण मी एक गोष्ट नक्की सांगू शकतो की जर माझ्या आईला योग्य वेळी माझ्याकडे लक्ष देता आलं नसतं किंवा माझा अभ्यास घेता आला नसता तर मी विचार नाही करू शकत की मी आज कुठे असलो असतो. आजच्या काळात working parents नी आपल्या पाल्याकडे लक्ष हे दिलंच पाहिजे नाहीतर या internet च्या जगात काय होईल ते देवच जाणे. बहुतांशी पालक याचा विचार करून आपापल्या परीने प्रयत्न करतात पण हा एक असा मुद्दा आहे की जो कोणीही विसरू नये.
आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर सिनेमा भाष्य करतो ते म्हणजे नवरा बायको मधला किंवा ते आणि त्यांच्या परिवारामधला वाढत चाललेला दुरावा. हा दुरावा अदृश्य असतो आणि तो एकमेकांना सांगण्याजोगा पण नसतो. म्हणजे हा तिथे राहून राहून फक्त राग-क्लेश वाढवायचं काम करतो. सर्व लोक त्यांच्या बाहेरच्या जगाकडून असणाऱ्या commitments साठी त्यांच्या एकमेकांकडूनच्या किंवा त्यांच्या मुलांसाठीच्या किंवा त्यांच्या परिवाराप्रती असणाऱ्या commitments विसरुन जातात. जरा आपल्या आसपास एक नजर टाका अनेक उदाहरणे सापडतील.
हे पहा मी मान्य करतो की हे माझं या सगळ्या गोष्टींबाबत बोलण्याचं वय नाही आहे पण हा मुद्दा एवढा भयावह आहे की आपण त्यांच्या परिणामांचा विचारदेखील करू शकत नाही. हा असा नकोसा असणारा परिणाम माझ्या किंवा आमच्या पिढीच्या वाट्याला येऊ नये यासाठी प्रयत्न करणं ही माझी आणि आमच्या पिढीची जवाबदारी आहे. आणि आम्ही त्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ हिच आशा. पण हा सिनेमा किंवा हा लेख तुमच्या मनामध्ये एक चर्चा सुरू करण्यात यशस्वी झाला तर यामध्ये मी माझं आणि या सिनेमाचं यश मानेन.
👍👍👌👌
LikeLiked by 1 person
Thank you so much..
LikeLike
Nice thought 👍👍It’s really important subject to speak up 😊
LikeLiked by 1 person
Dhanyawad…
LikeLike
Khup chan …🤩💯💯
LikeLiked by 1 person
Thank you
LikeLike
The topic here was really thought provoking one .but sorry to say but I feel you may have put it in more better way .Regardless it , I feel it was a good effort of yours
LikeLiked by 1 person
Sorry to hear that. This article was quite a spontaneous in nature for me. So it may have left some fine touches.
LikeLike
Hey brother,
You must not be sorry for this. This is your opinion and there’s no any compulsion on it, for being precisely constructed or perfectly moulded article types. You have written something which not many of this gen even think of, expressing it remains a different topic altogether. And anyways sometimes we go wrong with constructions and sometimes with punctuations. ‘Itna to chalta hai.’
That’s coming along nice. Keep it up mate.
LikeLiked by 1 person
🙏🙏
LikeLike
Vichar utamach ahe
LikeLiked by 1 person
🙏🙏
LikeLike
Bhari
LikeLiked by 1 person
Dhanyawad..
LikeLike
Exquisite…
LikeLiked by 1 person
Thank you, Akhilesh.
LikeLike