प्रिय २०२१

प्रिय २०२१,

दरवर्षी लोक आशा करायचे की नववर्ष अजून चांगलं जावं. पण यावर्षी ते अशीही आशा करतील की नववर्ष मागच्या वर्षाइतकं खराब नसावं. कमीत कमी या एका भावनेसाठी २०२० चे आभार. त्यानं आपल्याला काळजी करायला किंवा भिंतीमध्ये राहायला शिकवलं. तुही शिकव काही गोष्टी पण कमीत कमी २०२० सारखं घरांमध्ये डांबून असं काही टोकाचं करायला लाऊ नकोस.

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मध्यरात्रीच्या फटाक्यांनी पेक्षा नववर्षातील पहिल्या प्रातःकाळी रस्त्यावरील चुन्याच्या आकृती आणि संदेश हे जास्त प्रभावी साधन आहे असं मला वाटतं. त्यांच्या जवळजवळ प्रत्येक शब्दात जरी व्याकरणाची चूक असली तरी यामुळे पर्यावरणाचं नुकसान होत नाही त्याबद्दल चांगलं वाटतं. रस्ता खराब होतो पण तो काय दहा-पंधरा दिवसांमध्ये परत आहे तसा होतो. पण यावर्षी मला आत्तापर्यंत फक्त एकच कलाकृती दिसली आहे. त्यामुळे थोडी हुनहुन वाटत आहे.

हे नवीन वर्ष तसं अद्वितीय असंच वाटतं आहे. ग्रेट ब्रिटनला होणारा स्वातंत्र्याचा आनंद, अमेरिकेत येऊ पाहिलेली स्थिरता आणि कमी होणारं Trumpism, भारतामध्ये बळकट होत चाललेली लोकशाही. सगळं काही कौतुकास्पद आहे. पण काही गोष्टी अजूनही तशाच आहेत उदाहरणार्थ वेगाने होणारे हवामान बदल, मध्य पूर्वार्धातील संघर्ष, यमन चं humanitarian crisis इत्यादी. आपले राज्यकर्ते त्यावर काहीतरी उपाय करतील हीच अपेक्षा.

माझ्या या वर्षा कडून खूप अपेक्षा आहेत. हे पहिलं वर्ष असू शकतं ज्या वर्षी मी माझ्या आयुष्यातील पहिली कमाई करू शकतो. आम्ही खूप वाट बघितलीये याची. प्लीज माझ्याकडून ती सगळी काम करवून घे. आणि हे वर्ष माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय वर्ष होऊ दे हीच अपेक्षा.

आणि तुम्हा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

3 Comments

  1. Akhilesh Patki's avatar Akhilesh Patki says:

    🥺🥺🥺🥺🎉🎉🎉

    Like

Leave a Comment