
It’s getting awkward now!!
माझ्या “प्रिय २०२१” या ब्लॉगमध्ये कोविडच्या परिस्थितीबद्दल मी दाखवलेला आशावाद हा सपशेल फोल ठरलाय, २०२१ चा कोविड हा २०२० पेक्षा कित्येक पट जास्त भयंकर होता. त्या आशावादाचा जरा पुनर्विचार करायची गरज आहे असं वाटायला लागलंय.
पण तरीही या वर्षामध्ये माझ्या जगण्यामध्ये शैक्षणिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या जे बदल झालेत (बहुतांशी बदल सकारात्मकच आहेत) त्या मुळे मी या वर्षाला माझ्या आयुष्यातलं सर्वात सफल वर्ष म्हणेल, आनंदी नाही “सफल”.
याच वर्षी मी अखेर CA-Inter पास-आऊट झालो, माझी आर्टिकलशिप सुरू झाली, भरपूर नवीन मित्र-मैत्रिणी बनले, मिळालेल्या पैशातून investments सुरू आहेत, आणि वेध लागले ते नोव्हेंबर २०२३ च्या CA-Final च्या परीक्षेचे. आता प्रत्येक विषयाचे पर्वत सर करत करत शेवटी एक उत्तुंग शिखर जिंकायचं आहे.
तर मग २०२२ कोविडच्या परिस्थितीबद्दल कोणतीही आशा करणे हे तर मला थोडं मूर्खपणाच वाटतंय, कोविड तर आपल्या सोबत राहणार आहेच, हां त्याची तीव्रता कमी होईल पण त्यांच्यासोबत राहायची सवय करून घ्यावी लागेल.
तर यावर्षी अजून भरपूर नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील आणि भविष्यात या सर्व गोष्टींचा अनुभवांचा फायदा होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
1 Comment