आपल्या सिरीज मधलं हे तिसरं पत्र! पहिली दोन पत्रं तुम्हाला इथं मिळतील. २०२१ आणि २०२२. आत्ता आपण २०२३ बद्दल बोलू.
माझी खूप इच्छा आहे की या पत्रामध्ये आपण कोरोना बद्दल अजिबात बोलू नये पण हा कोरोना काय आपली पाठ सोडत नाहीये. मागच्या वर्षी मी जसं पत्र लिहिलं आणि त्याच वेळी “Omicron” variant नी आपल्याला विळख्यात घेतलं. तो विळखा खूप कमी वेळासाठी होता पण बाधितांची संख्या खूपच जास्त होती. असो माझ्या इच्छेनुसार मी आज कोरोना बद्दल काहीही बोलणार नाहीये. तर आपण पत्र सुरू करूयात.
२०२२ अखेरीस संपलय आणि २०२३ सुरू होतंय. जसं २०२१ मध्ये माझ्या Professional career ची सुरुवात झाली. २०२२ नी त्याला एका विशिष्ठ प्रगल्भतेवर पोहोचवून ठेवलं. अजून खूप काही शिकायचं, काबीज करायचं बाकी आहे. पण हा काळ एक खूप चांगला mentor ठरला. या वर्षी खूप चांगल्या कामाच्या शाबाशी पासून एकदमच बेजबाबदारीच्या गोष्टी करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी करून व त्यावर शब्दसुमने ऐकून झाली. येणाऱ्या वर्षात चांगल्या कामाच्या गोष्टी जास्त होतील आणि ज्या चुका होतील त्या नवीन प्रकार च्या असतील ज्याने एक learning curve तयार होईल हीच अपेक्षा.
हे २०२२ वर्ष एका गोष्टीसाठी माझ्या लक्षात राहील ते म्हणजे “Return of cinema”. या वर्षी माझ्यासाठी बहुप्रतिक्षित असा “Top Gun: Maverick” हा सिनेमा प्रदर्शित झाला. टॉम क्रुझ काय चीज आहे ते या पिक्चरनी दाखवून दिलं. त्याचं सिनेमाच्या प्रती असलेलं समर्पण हे अद्भुत आहे. या वर्षी पण त्याला “Mission Impossible” सोबत तीच जादू अजून एकदा करायची संधी आहे. तो ही जादुगरी अजून एकदा नक्की करेल हीच आशा.
अजून एक नोटेबल इव्हेंट आहे या येत्या वर्षांमध्ये. माझी CA-Final ची परीक्षा. या इव्हेंट च्या जोरदार तयारी साठी आम्हाला चार महिन्यांची सुट्टी पण असेल. तर मग त्या सुट्टी मध्ये पूर्ण मेहनत करून, मी या परीक्षेला माझ्या जीवनातला एकदाच सामोरं जायला लागावा असा इव्हेंट बनवेन हाच निर्धार.
तर मग आपण खुल्या हाताने स्वागत करूयात २०२३ चं याच सगळ्या अपेक्षा, आशा आणि निर्धारांसहित!!!
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा! Happy New Year!
एक announcement करायची आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये मला जयपूरला जायची संधी मिळाली. Anna paid for this! तर त्या प्रवासावरती ब्लॉग्ज ची एक series करायचं डोक्यात आहे. ती २ किंवा ३ पार्ट ची सिरीज होईल. त्या पैकी एक ब्लॉग already लिहून झालाय. Hope प्रतिसाद चांगला मिळेल. लवकरच भेटू🤞
सुंदर💯
LikeLiked by 1 person
Wish you Very Happy New Year and Best of luck for Your CA final exam…
JOSH HAI !!
LikeLiked by 1 person
Mast!!!
LikeLike